Breaking News
recent

हिंगणे गव्हाड येथील शेतकऱ्याचा रोटावेटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू

 


नांदुरा प्रतिनिधी

ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असताना रोटावेटर मध्ये अडकून ३५ वर्षीय शेतकन्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील टाकळी वतपाळ शेतशिवारात आज दिनांक १७ जून रोजी दुपारी १:३०ते २ वाजताच्या दरम्यान घडली शत्रुघ्न समाधान तितरे वय अंदाजे ३५ वर्ष राहणार हिंगणे गव्हाड असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत प्राथमिक प्राप्त माहितीनुसार शत्रुघ्न समाधान तितरे टाकळी वतपाळ येथील वासुदेव जमाव यांच्या शेतात रोटावेटर ने शेतीची कामगिरी करीत असताना रोटावेटर मध्ये अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती टाकली वतपाळ येथील गावकऱ्यांना मिळताच सर्व गावकरी मदतीसाठी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेची माहिती चांदुर बिस्वा येथील पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Powered by Blogger.