केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात संग्रामपुर येथे कॉंग्रेसचे वतीने रस्ता रोको व धरने आंदोलन
मतीन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर :
भारतीय राष्ट्रय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. या चौकशीच्या विरोधात केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात संग्रामपुर तालुका व शहर काँग्रेसचे वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे यांचे नेतृत्वात संग्रामपुरात रस्ता रोको व धरने आंदोलन करण्यात आले.
कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या निर्देशावरून व बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे मा.अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार खासदार राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालय ( ईडी ) मार्फत तीन दिवसांपासून चाललेली कारवाई व केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात दि. १७ जून रोजी संग्रामपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने संग्रामपुर जळगाव जामोद रोडवर रास्ता रोको आंदोलन व धरने आंदोलन करुन मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली. कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तामगांव पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केले व नंतर सोडून देण्यात आले.
केंद्रीय भाजपा सरकार हे ईडी च्या गैरवापर करत आहे असे आरोप कॉंग्रेस पदाधिकारी यांचेकडून करण्यात आले.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष तेजराव मारोडे, माजी तालुकाध्यक्ष संतोषराव राजनकर, जेष्ठ नेते मनोहरराव बोराखडे, जिल्हा सरचिटणीस संजय ढगे, नगरपंचायतचे माजी नगरध्यक्ष हरिभाऊ राजनकार, जेष्ठ नेते जाहेद अली, सरपंच अभयसिंह मारोडे, शहरध्यक्ष सैय्यद आसिफ, नगरसेवक शेख अफसर कुरेशी, पं.स.सदस्य अख्तर मोरे, तालुका उपाध्यक्ष कमु मिर्झा, सेवादल तालुकाध्यक्ष शिवकुमार गिरी, अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष जाहेर अली, युवक कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस शेख अफरोज, मोहन पाटील, सतीश टाकळकर, अमोल घोडेस्वार, शंकरनाथ विश्वकर्मा, अजय अग्रवाल, नरेश खोंड, मोहन रौंदळे, अशोक पालकर, राजु राठोड, शेख सद्दाम, मुरलीधर उमरकर, संतोष टाकळकर, अब्दुल लतीफ भालेराव, प्रकाश सबे, गोपाल इंगळे, प्रशांत गावंडे यांचेसह तालुका व शहरातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.