सप्तशृंगी निवासिनी देवी गडावरील ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी यांनी दर्शवला विरोध
वार्ताहर सप्तशृंगी गड सोमनाथ मानकर
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड याठिकाणी श्रीक्षेत्र सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट च्या वतीने कोरोणा च्या काळामध्ये दोन वर्षासाठी मंदिर बंद होते त्यावेळेस विविध कामांना या ठिकाणी सुरवात करण्यात आलेली आहे यामध्ये या लोकडाउन च्या काळामध्ये अनेक वेगवेगळे कामे करून देवस्थानाची शोभा वाढविण्यात आली आहे त्यामध्ये पहिली पायरी येथील प्रवेशद्वार सुद्धा होता त्यानंतर आई भगवती चे समोर एक चांदीची कमान होती तीसुद्धा वेगळ्या स्वरूपामध्ये तयार करावी त्यासाठी सात ते आठ महिने झाले तरी सुद्धा अजून तयार नाही परंतु आता देवस्थान एक वेगळा घाट घातलेला आहे तो म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून आई भगवती च्या समोर एक फळी ठेवण्यात आलेली आहे .
त्या फळी मुळे आई भगवती ला अलकार नेसवणे असेल फुल हार घालने असेल किंवा भाविकांनी भगवतीला अर्पण केलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यासाठी सोय होती परंतु सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट आता ती फळी काढून व त्याठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट तयार करावं असं संस्थान विश्वस्त यांनी ठरवले आहे परंतु या साठी गडावरील ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी यांनी विरोध दर्शवला आहे तसेच आई भगवतीला अनेक वर्षापासून प्रत्येक पायरीवर कापूर जाळणे नारळ फोडणे हळदी-कुंकू पानसुपारी वाहने या सर्व प्रथा सप्तशृंगी संस्थान बंद केले असून त्या परत चालू कराव्या व या ठिकाणी असलेली फळी काढू नये
अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त यांनी जर ही फळी काढण्याचा प्रयत्न केला तर भाजपच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन पहिली पायरी याठिकाणी छेडण्यात येईल याची दखल घ्यावी असे पत्राद्वारे निवेदन दिले आहे साठी भा ज प ..पदाधिकारी . शहराध्यक्ष प्रकाश कडवे रामप्रसाद बत्तासे रवी कदम राजु गव्हाने बबलु गायकवाड .राजु वाघ सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके नवनाथ बेनके भुषन देशमुख व गडावरील ग्रामस्थ होते