श्रीकाळभैरवनाथ यवत पंचक्रोशी प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याचे देहूकडे प्रस्थान.
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - यवत पंचक्रोशीतील श्रीकाळभैरवनाथ प्रासादिक दिंडी श्रीक्षेत्र देहुगावाकडे प्रस्थान होत असताना दिंडी सोहळ्याचे प्रथम यवत येथील श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बबन आबा दोरगे, मा.उपसंरपच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांच्या हस्ते आरती करून ग्रामप्रदक्षिणा घालून मग दिंडीचे देहूकडे वाहनांने प्रस्थान झाले.यवत दिंडीला यवत येथील दत्तात्रय विठ्ठल दोरगेपाटील यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री स्व. सरूबाई विठ्ठलराव दोरगेपाटील यांच्या स्मरणार्थ पितळी तुळशी वृंदावन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,मा.पंचायत सदस्य रामदासआण्णा दोरगे,ह.भ.प. नाना महाराज शितोळे,ह.भ.प. राहुलमहाराज खुटवड, ह.भ.प सुरेशमहाराज खुटवाड,ह,भ,प दिपकमहाराज मोटे,ह.भ.प. गणेशमहाराज दोरगे,मा.ग्रामपंचायत सदस्य दिलीप दोरगे,साजीदभाई सय्यद, श्रीपती दोरगे, बाळासाहेब मलभारे, कैलास आबा दोरगे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
उद्या देहूगाव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याला सुरुवात होत असून. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र ,कर्नाटक व विविध भागातून येणाऱ्या दिंड्या आज देहू,आळंदी येथे दाखल होत आहेत. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रस्थान सोहळा पार पडला असून आज तुकाराम महाराजांची पालखी मंदिराशेजारील संत तुकाराम महाराज जन्मस्थान वाड्यामध्ये मुक्कामी असते उद्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पायीवारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.