जि प केंद्रीय मराठी प्राथमिक शाळे मध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना पोषण आहार सुरळीत वाटप
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
जि प केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा दे माळी येथे शालेय पोषण आहार दिनांक 16 जून 2022रोज गूरूवार पासून सकाळी आठ ते अकरा या वेळेत पालकांना वाटप सूरू आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता Covid-19 च्या सर्व नियमाचे पालन करूनगेल्या तीन दिवसापासून तांदूळ व पोषण आहार वाटप सुरू आहे.
शालेय विद्यार्थी संख्या पटावर 258 विद्यार्थी असून पर विद्यार्थ्याला मागील वर्षातील covid-19 च्या काळातील पोषण आहार गेल्या आठ महिन्याचा विद्यार्थ्यांना सुरळीत वाटप करण्यात आला कार्य दिवसाप्रमाणे पर विद्यार्थी 100 ग्रॅम तांदूळ वटाणा मुंग डाळ वाटप करण्यात आला पर विद्यार्थ्याला covid-19 च्या काळातील साडे एकोणीस किलो पोषण आहार देऊन शाळेतील सर्व शिक्षकांनी गेल्या तीन दिवसापासून सुरळीत रित्या पालकांपर्यंत पोचला
