Breaking News
recent

मोरखेड येथील 24 वर्षीय युवक बेपत्ता



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

  मलकापूर तालुक्यातील मोरखेड येथील 24 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रवीण नितीन नाफडे वय 24 वर्षे राहणार मोरखेड हा शेतातून कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेला व उशिरापर्यंत घरी न आल्याने मित्र व नातेवाईक यांना विचारणा केली असता तो मिळून आला नाही. 

  याबाबतची फिर्याद त्याचे वडील नितिन अविनाश नाफडे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला हकीकत सांगून तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास एफसी मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. का. सचिन दासर करीत आहे.
Powered by Blogger.