विद्युतचा शॉक लागून माकडाचा मृत्यू
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
पावसाळापूर्वी करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे अद्यापही करण्यात आल्याने झाडावरील माकडाचा विद्युत तारा असलेल्या पोलवर चिकटून मृत्यू झाल्याची घटना मलकापूर शहरातील माता महाकाली नगरातील विवेकानंद आश्रम परिसरात घडली. विद्युत प्रवाहित असलेल्या तारा व पोलला वृक्षांचा वेढा असल्यास पावसाळ्यात अनेकदा विद्युत प्रवाह खंडीत होतो. पाऊस व वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटण्याचे प्रकारही घडतात. परिणामत: वीज पुरवठा खंडित होतो.
दरम्यान कर्मचाऱ्यांना धावपळ क तांत्रिक बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा लागतो. या बाबीची शक्यता गृ धरत पावसाळ्यापूर्वीच वृक्षांचा वेढा असलेल्या विद्युत तारा व इलेक्ट्रिक पोल वीज वितरण कंपनीला मोकळे करावे लागतात. तारा अथवा पोल वर आलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटणी करून घ्याव्या लागतात. मात्र मलकापुरात पावसाळापूर्वी करावयाची ही देखभाल दुरुस्तीची कामे अद्यापही वीज वितरण कंपनीकडून करण्यात आली नसल्याचे दिसत आहे.