कोराडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला.
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
कोराडी प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून वरूणराजा सतत कोसळत असल्यामुळे मेहकर तालुक्यताल कोराडी प्रकल्प तुडुंब भरला आहे. कोराडी प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेच्या दृष्ठीने धोक्याचा इशारा दिला आहे.