तेजस्वी हॉस्पिटल चे नित्यानंद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
दि 24जुलै रोजी आपण तेजस्वी हॉस्पिटल मेहकर आपल्या हॉस्पिटल च्या वतीने नित्यानंद सेवा प्रकलपातील 40अनाथ मुलासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून सर्वांची उत्तम तपासणी केली.सोबत सर्व मुलांना औषधं देखील उपलब्ध करून दिली.
पावसाळ्यात आपले व्यस्त दिनक्रम असून देखील आपण निस्वार्थी भावनेने भरपूर वेळ देऊन,, अनाथ मुलांना दिलासा दिला.अगदी मायेच्या ममतेने ओथम्बलेल्या निःस्पृह भावनेने ताप, त्वचा, खोकला, संसर्ग जन्य आजार, व इतर सर्व आजराची सुसृषा करत आपण आपुलकी विषद केली.एक महिनाभर पुरेल एवढा औषध साठा, व अत्यन्त दर्जेदार व प्रतिष्ठित कंपनी च्या antibiotic व सिरप उपलब्ध करून दिले
सगळीकडे तापाची साथ सुरु असतांना,, ह्या संसर्गजण्य परिस्थितीत आपल शिबीर म्हणजे एक आरोग्य संजीवनी देणारं ठरेलं. "काय द्यावे तुम्हा व्हावे उतराई "अशी आमच्या अंतःकरणाची अवस्था आपले मनःपूर्वक आभार
या शिबिरादरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवीणारे प्रा. प्रशांत जी गुंजकर सर,आदरणीय वाल्मिकजी गुंजकर सर, सौ गुंजकर ताई, यांनी देखील परिश्रम घेतले.वेळोवेळी नित्यानंद च्या लेकरांना विविध माध्यमातून भक्कम आधार देणाऱ्या आपल्या सर्व परिवाराचा हा पराकोटींचा सेवाभाव आम्हाला सदैव बळ देतो.आपल्या सदैव ऋणाईत,नित्यानंद परिवार.