Breaking News
recent

देळगाव माळीच्या महात्मा फुले महाविद्यालयात फिशरी विषयास मान्यता


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

    शैक्षणिक वर्ष 22-23 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय  देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे फ्रेश वॉटर अँड फिष कल्चर (फिशरी) या 200 गुणांचा विषयास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा मेडिकल कडे कल आहे अशा विद्यार्थ्यांना  गणित व मराठी विषया ऐवजी हा विषय अभ्यासता येणार आहे.  तसेच डी फार्म ,बी फार्म, बीएससी( फिशरी) एम एस सी (फिशरी)  नर्सिंग या विषयात सुद्धा करियर करता येणार आहे. 

    जगात 70 टक्के भूभागावर पाणी आहे आणि या जगाची 10000 टन अन्नाची गरज समुद्राच्या माशांपासून पूर्ण होते वाढत्या लोकसंख्येला भविष्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी फिशरी सायन्स मधील अधिकच्या संशोधनातून माशाच्या नवीन प्रजाती निर्माण करणे व नवीन  संशोधनासाठी या विषयास प्रचंड संधी आहे. ही गरज लक्षात घेऊन महाविद्यालयाचे सचिव  किशोर भाऊ गाभणे , अध्यक्ष  डॉ.अनिल कुमार गाभणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य विश्वनाथ बाहेकर यांनी विशेष प्रयत्न करून या विषयास मान्यता मिळवली आहे.

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे  उपाध्यक्ष दि स अंभोरे, संचालक शेषराव बापू सुरूशे,  राजेश मगर ,सौ रेखाताई अनिल गाभणे इत्यादी संचालक मंडळांनी केले आहे . प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.

Powered by Blogger.