Breaking News
recent

निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्ष संघटना मजबुतीसाठी कामाला लागावे: रविंद्र मिर्लेकर

 


विजय कदम प्रतिनिधी दौंड

दौंड : शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी आगामी प्रत्येक निवडणुक कडवटपणे लढून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पक्ष संघटना मजबुतीसाठी कामाला लागावे, अशा सूचना शिवसेना समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर यांनी दौंड येथिल पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या. 

आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दौंड शहर येथे शुक्रवार दि.२२ रोजी हॅाटेल सिटी इन मध्ये आयोजित तालुक्यातील पदाधिकारी व बुथ प्रमुखांच्या आढावा बैठकीत मिर्लेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मिर्लेकर म्हणाले कि, सत्तापिपासू भाजपाने शिवसेना फोडली असली तरी, सेनेचा निष्ठावंत कडवट शिवसैनिक आजही पक्षासोबत आहे. शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही शिवसैनिकांना संघटना मजबुतीसाठी खडतर परिश्रम करण्याची प्रेरणा देतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुयांच्या विचारांचे असे भगवे वादळ निर्माण करा की, विरोधक पाला- पाचोळ्यासारखा उडाला पाहिजे.  


शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यावेळी म्हणाले कि, पक्ष संघटना म्हणून आपण सर्व शिवसैनिकांनी पक्षातून गेलेल्याची चिंता करू नये. पक्षातून आजपर्यंत किती मातब्बर गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही. दौंड तालुक्यात आगामी निवडणुकीत प्रत्येक निष्ठावंत, कट्टर शिवसैनिकांच्या साथीने संघटना मजबूत ठेवून काम केल्यास नव्या दमाची शिवसेना दौंड मध्ये नक्कीच यश संपादन करेल असा विश्वास अहिर यांनी यावेळी व्यक्त केला. 

जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले कि, दौंड तालुक्यातील माझा शिवसैनिक हा कायम पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबतच असून, दौंड तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून पक्ष मजबुतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पासलकर यांनी केले. 

यावेळी महिला सह संपर्क संघटिका स्वाती ढमाले, युवासेना विभागिय सचिव अविनाश बलकवडे, सहकार सेना राज्य उपाध्यक्ष प्रदीप खोपडे, युवती सेना सह सचिव शर्मिला येवले, विधानसभा महिला संघटक कस्तुरी पाटील ,शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, शिवसेना कामगार संघटना तालुका प्रमुख चांद शेख, शिवसेना महिला संघटनेच्या छाया जगताप, स्वाती ढमाले, शिवसेना उप तालुका प्रमुख नवनाथ जगताप, विजयसिंह चव्हाण, रमाकांत निवंगुणे,सदानंद लकडे, सागर पारखे,अमोल काळे दौंड शहर संघटक अजय कटारे व इतर सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.



Powered by Blogger.