Breaking News
recent

आंतरराष्ट्रीय रक्तदाता दिवस निमित्त अमर पाटील यांना प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित

 


श्रीकांत हिवाळे प्रतिनिधी,नांदुरा 

  गेल्या १० वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय राहून २४ तास लोकसेवेचा अजेंडा घेऊन आरोग्य क्षेत्रात,शिक्षण क्षेत्रात व इतर सामाजिक कार्य करत सामान्य लोकांची रखडलेली कामे मार्गी लावणे तसेच दरवर्षी रक्तदान शिबिर घेऊन वर्षाकाठी शेकडो गरजूंना रक्त पुरवणारे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नांदुरा  तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांना आंतरराष्ट्रीय रक्तदाता दिवस निमित्त प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.हे प्रमाणपत्र  जय महाराणा रक्तदान समूह भारत या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले.यासाठी एकनिष्ठा फाऊंडेशन चे अध्यक्ष सुरजभैया यादव यांनी अमर पाटील यांचे सामाजिक कार्य या संस्थे पर्यंत पोहचविण्याचे कार्य केल्यामुळे सदर कार्याची दखल घेत हे प्रमाणपत्र देण्यात आले. माझ्या कार्याची दखल घेत मला प्रमाणपत्र दिल्याल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात रक्तसेवा करण्याची ऊर्जा मिळाल्याचे अमर पाटील यांनी म्हटले

Powered by Blogger.