स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बुलडाणा प्रशिक्षण समारोप समारंभ
बुलढाणा प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था येथे दिनाक १८ जुलै पासून महिलांचे पापड लोणचे मसाला पावडर बनविणे याचे प्रशिक्षण सुरु होते. आज दिनाक २७ जुलै रोजी हया प्रशिक्षणाच्या समारोप समारंभाच्या वेळी मा. आमदार संजुभाऊ गायकवाड तसेच अग्रणी बँक अधिकारी मा. हेडाऊ साहेब, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राध्यापक मा. भालतिलक सर, मा. सोनटक्के सर, सावजी सर, सागवान येथील सरपंच राजपूत सर आणि संस्थेचे संचालक कवाणे साहेब, तसेच सूत्रसंचालक मनीषा देव इत्यादी उपस्थिती होते.
या सर्वांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मा. आमदार साहेबांनी कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले. हेडाऊ साहेबांनी कर्ज प्रकारानाब्ब्द्ल व योजनाबद्द्ल माहिती दिली.