Breaking News
recent

हर घर तिरंगा झेंडा उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा झेंडा उपक्रम राबविण्याकरीता प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून देशाप्रती आपली सद्भावना व्यक्त करावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांनी केले. स्थानिक भ्रातृमंडळ येथे प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा झेंडा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीकोनातून महसूल, पं. स., पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

   यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, तहसीलदार राजेश सुरडकर, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, मुख्याधिकारी रमेश ढगे, ठाणेदार विजयसिंह राजपूत, एमआयडीसी ठाणेदार आनंद महाजन, ग्रामीणचे ठाणेदार मिर्झा, नायब तहसीलदार डॉ. वाघ यांचेसह आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हर घर तिरंगा झेंडा उपक्रम राबविण्याकरीता प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून आपल्या देशभावना व्यक्त करण्याकरीता सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. 

   तर याबाबतचे नियोजन शहराकरीता न. प. प्रशासन, ग्रामीण भागाकरीता महसूल व पंचायत समिती प्रशासन तसेच अन्य ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी करण्याकरीता प्रयत्न करावे, असे यावेळी बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

Powered by Blogger.