प्रशांत पाटील व गणेश बंगळे यांचा बुलढाणा शहर व जिल्हा केमिस्ट संघटनेकडून यथोचित सत्कार
![]() | ||
प्रशांत पाटील यांची रयतचे राज्य प्रवक्ते तर गणेश बंगळे यांची राज्य औषध व्यवसाय परिषद निवडणूकीत विजय |
बुलढाणा - दि.२२ जुलै रोजी बुलडाणा येथील केमिस्ट भवन येथे बुलढाणा शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट व जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विध्यमानाने केमिस्ट परिवारातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन बुलढाणा येथे करण्यात आले होते.
बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा सहसचिव प्रशांत ढोरे पाटील यांची रयत क्रांती पक्ष राज्य प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल व बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे शिक्षण समितीचे गणेश बंगळे यांची महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निवडणूकीत भरघोस मताधिक्याने निवडून आल्या बद्दल शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केमिस्ट परिवारातील सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिलभाऊ नावदंर,बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नहार, जिल्हा सचिव गजानन शिंदे,बुलढाणा शहर केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष राजेश पाटील यांनी सत्कारमूर्तीच्या कार्याच कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ,सूत्रसंचालन रवी वडते यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश बंगळे यांनी केले, याप्रसंगी भारंबे साहेब,विजय एन्डोले,अजिंक्य ठाकरे,धर्मेश शहा,महेश चाकोतकर,अजय इरफान भाई,सुनील पारसकर,सुभाष पाटील,शरद सपकाळ,राम पर्हाड, शरद डोईफोडे,वैभव बारोटे,गजानन दिवटे, विजय टेकाळे, दशरथ हुडेकर,गणेश बरडे यांच्यासह बुलढाणा शहर व जिल्ह्याभरातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.