Breaking News
recent

बामसेफतर्फे वायूदलातील बुद्धपाली चंदनखेडेचा सत्कार



    सिंदेवाही - बामसेफ कर्मचारी संघटना तालुका सिंदेवाहीच्या वतीने नुकत्याच केरळ राज्यातील कोची मधिल एयर इंडियात  केंद्रीय सुरक्षा बलातील कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेल्या सिंदेवाही नगर पंचायत अंतर्गत जाटलापुर प्रभागातील बुद्धपाली वनराज चंदनखेडे हिचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला .

    याप्रसंगी बामसेफचे शीलपाल ताम्बागडे ,बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विकास गेडाम व बहुजन समाज पार्टीचे तेजस डोंगरे यांचेसह शैलेंद्र खण्डाले , प्रा .भारत मेश्राम ,विजय रामटेके ,पवन जगताप व लोकमान णिहाटे उपस्थित होते 

Powered by Blogger.