Breaking News
recent

वाकोडी ग्रा.प.अंतर्गत आदर्श नगरासह आदी भागांत बुस्टर डोससह कोरोना लसीकरण


मलकापुर:

     वाकोडी ग्रा.प.अंतर्गत येत असलेल्या आदर्श नगर,पवनसुत नगर,साई नगर, सरस्वती नगर, नालंदा नगर, तुलसी नगर, संताजी नगर,शंकर नगर, वृंदावन नगर,नंदनवन नगरासह आदी नगरातील महिला व पुरुष ग्रामस्थांना तसेच 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना कोर्बेव्हाॅक्स कोविड लसीचे दोन्ही डोस, अठरा वर्षांवरील युवक युवतींना कोरोना आजारापासुन संरक्षण तथा प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी " कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस, तसेच अठरा वर्षांवरील ज्या ग्रामस्थांचे दोन्ही डोस घेऊन दोन महिने झालेल्या ग्रामस्थांना बुस्टर डोस च्या शिबिराचे आयोजन.

     डॉ.शुभांगी फेंगडे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र उमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.23 शनिवार रोजी आदर्श नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात सकाळी 10 ते 2 या वेळेत वाकोडी ग्रा.प च्या सरपंचा ममता ताई हेलोडे, सचिव कैलास चौधरी,ग्रा.प.सदस्य गजानन ठोसर, सदाशिव शेकोकार,अशोक राजपुत सह आदींनी आयोजित केले होते.

     या शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्र ऊमाळी चे सि.एच.ओ डॉ.सोहेल रफीक,आरोग्य सेवक कैलास सरोदे,पुनम भोसले सिस्टर,अंगणवाडी सेविका निता बावस्कार,आशासेविका शोभा निकम, किशोर डवले विद्या विकास विद्यालयाचे शिक्षक वृंद गणेश राजभोग,अनुपम सावळे सर इ.सह वाकोडी ग्रा.पं चे कर्मचारी उपस्थित होते .

Powered by Blogger.