Breaking News
recent

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय दे माळी च्या तब्बल ५ विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड

 


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या निकालामध्ये उत्तम गुण संपादन करून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील तब्बल पाच विद्यार्थी  घवघवीत  यश संपादन करून इयत्ता सहावीसाठी नवोदय प्रवेश पात्र ठरले आहेत.१). कृष्णा सुरेश तुपकर.२)सोहम भारत भराड .३).प्रणव शंकर कुडके ४)प्रथमेश कैलास बळी.५) नंदीनी प्रल्हाद भारूडकर,..ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण व   उज्ज्वल यश ही परंपरा असलेल्या म.ज्यो.फुले विद्यालयातील प्रत्येक परीक्षेत विद्यार्थी हे घवघवीत यश संपादन करतात ‌ . विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशामुळे गावाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे.  

  ग्रामीण भागातून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी  यंदा देखील चुरस व मोठी स्पर्धा होती. गुरुजनांचे मार्गदर्शन पालकांचे  आशीर्वाद व  कठोर मेहनतीच्या बळावरती हे यश संपादन केल्याचे हे पाचही विद्यार्थी सांगतात. एकाच विद्यालयातील तब्बल पाच विद्यार्थ्यांची  यशस्वी निवड होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल  . ‌ विद्यालयातील नवोदय साठी पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांचे सर्व परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल

  सर्व  पात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचे  अध्यक्ष म. ज्यो. फुले शिक्षण संस्था देऊळगावमाळी मा. डॉ.अनिलकुमार शा.गाभणे साहेब,उपाध्यक्ष मा.दि.स. अंभोरे साहेब , सचिव मा.किशोरभाऊ वि.गाभणे साहेब तसेच सर्व संचालक मंडळ तथा प्राचार्य  विश्वनाथ बाहेकर ,पर्यवेक्षक मधुकर गाभणे , प्राध्यापक, प्राध्यापिका ,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तथा संपूर्ण फुले परिवाराणे  अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या  आहेत.

Powered by Blogger.