Breaking News
recent

अरण येथील संजीवनी समाधी सोहळा



 यवत/प्रतिनिधी मंगेश लडकत 

धन्य ते अरण! रत्नाची खाण!! जन्माला तो निधान!सागर!! प्रेमाचे आगर! अभंगा प्रमाणे संत सावतामाळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील आरण या गावची आख्यायिका आहे . कांदा मुळा, भाजी अवघी विठाई माझी, असे म्हणत पंढरपूरला कधीही न जाता  आपल्या कामातच विठ्ठलाला शोधणारे वारकरी संप्रदायातील महान संत श्री संतशिरोमणी सावता महाराज यांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे व परंपरेप्रमाणे विठुरायाच्या पादुका पालखी  सोहळा येतो. यंदा या सोहळ्याचे रविवार दिनांक 24 जुलै रोजी पंढरपूर येथून प्रस्थान केले असून दिनांक 26 जुलैरोजी वार मंगळवार संध्याकाळी सात वाजता अरण येथील संजीवनी समाधी सोहळा या ठिकाणी पालखी सोहळा दाखल होईल,

Powered by Blogger.