टिटवी केंद्रातील सरस्वती विद्यालय पांग्राडोळे येथे या सत्रातील आज पहीली शिक्षण परिषद
मेहकर तालुका प्रतिनिधी ,शिवशंकर मगर
शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी श्री समाधानजी तारे सर (प्राचार्य),प्रमुख मार्गदर्शक श्री जंगलसिंग अ.राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून श्री मदन डव्हळे सर(साधनव्यक्ती),श्री गरकळ सर(साधनव्यक्ती),श्री सुनिल डोळे सर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.शिक्षण परिषदेला टिटवी केंद्रातील 74 शिक्षकांची उपस्थिती होती.
शिक्षण परिषदेत खालील कार्यक्रम घेण्यात आले.
1) मान्यवरांच्या हस्ते -विद्येची आराध्य देवता सरस्वती देवीचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
2) सकाळी - 11.30 ते 12.00 या वेळेत वर्ग 8 वी मधील विद्यार्थिनींनी उत्कृष्ठ दैनिक परिपाठ सादर केला.
3) कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन - 12.00 ते 2.30 वाजेपर्यंत श्री जं.अ.राठोड(केंद्रप्रमुख) यांनी केले.
विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करणे, सेतू अभ्यासक्रम नियोजित वेळापत्रकानुसार राबविणे, विद्यार्थी उपस्थिती 100% ठेवणे, शासनाकडून प्राप्त इंग्रजी, भाषा, गणित, विज्ञान साहित्य पेटीतील साहित्य अध्ययन-अध्यापनामध्ये वापर करणे, शाळेच्या प्रगतीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व समाजाचा सहभाग घेणे या व इतर शैक्षणिक व कार्यालयीन कामकाजा बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
4) दुसऱ्या सत्रात- 2.30 ते 3.10 वाजेपर्यंत श्री खरात सर यांनी भूमिती विषयावर आदर्श पाठ सादर केला. आदर्श पाठावर 4 शिक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
5) 3.10 ते 4.00 वाजेपर्यंत साधनव्यक्ती श्री मदन डव्हळे सर व श्री गरकळ सर यांनी निपुण भारत व सेतू अभ्यासक्रम या विषयावर सविस्तर मागदर्शन केले.
6) 4.00 ते 4.15 वाजेपर्यंत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा परिचय व सत्कार करण्यात आला.
7) 4.15 ते 4. 30 या वेळेत प्राचार्य श्री समाधानजी तारे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
8) 4.30 ते 5.00 वाजेपर्यंत सर्व शिक्षकांनी अल्पोपहार /नाश्ता व चहा याचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री गजानन तुपकर सर यांनी केले अशाप्रकारे पहिली शिक्षण परिषद संपन्न झाली.