Breaking News
recent

मलकापूर येथे जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे थाटात उदघाटण.


मलकापूर प्रतिनिधी

     येथील जनता महाविद्यालयात स्पोर्टस् फॅसेलिटी सेंटरच्या बॅडमिंटन हाॅल मध्ये जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे थाटात उदघाटण संपन्न झाले. बुलढाणा जिल्हा बाॅलबॅडमिंटन असोसिएशन व स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटण समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध उद्योजक मनिष लखानी, आदित्य बाहेती, किशोर चांडक, राम होंडाचे संचालक राम अग्रवाल, खामगाव येथील बिंदेश संगवी आदी मान्यवर उपस्थित होते. 

   ११,१५ व १७ वर्षा १५ आतील  स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ९० खेळाडूंचा सहभाग राहिला असूनस्पर्धेसाठी पंच समिती म्हणून राम काचवाल चिखली, अतुल हाडे बुलढाणा, अमोल तायडे, मलकापूर, अविनाश एरळीकर, मलकापूर  तर तांत्रिक समिती मध्ये दिपक चव्हाण खामगाव, अनिल जाधव, मलकापूर,  संकेत आदींचा सहभाग राहिला 

    स्पर्धेच्या आयोजनात बुलढाणा जिल्हा बाॅलबॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विजय पळसकर,  स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूर चे अध्यक्ष प्रा. डाॅ नितीन भुजबळ,  स्पोर्टस् फॅसेलिटी सेंटरचे व्यवस्थापक प्रा. प्रफुल्ल वानखेडे यांचे महत्व योगदिन राहीले.

Powered by Blogger.