रेल्वे आर.पी.एफ च्या वतीने बुलेट रॅलीचे आयोजन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
RPF सेवेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई ते दिल्ली पर्यंत आर.पी.एफ कर्मचारी यांचे वतीने बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आगमन दिन. ५ जुलै २०२२ मंगळवार रोजी मलकापूर, जि. बुलढाणा येथील रेल्वे स्थानकावर झाले.यावेळी हि मोटारसायकल रॅली रेल्वे स्थानकापासून निघून शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली.
रेल्वे गेट क्राॅसिंग कशा पद्धतीने करावी, रेल्वे मधील चैन का ओढू नये व ती केव्हा ओढावी, तिचा उपयोग केव्हा करावा इत्यादी नियमांविषयी जनजागृती व मार्गदर्शन या रॅलीद्वारे करण्यात आले. तसेच आपल्या देशासाठी व रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणार्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच जनतेद्वारे त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमधे शहरातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.