Breaking News
recent

हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने डॉक्टर डे उत्साहात साजरा.


नागेश सुरंगे मलकापूर प्रतिनिधी

        डॉक्टर डे निमित्त नेहमीच वेग वेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने मलकापूर शहरातील डॉ.प्रशांत माने अस्थिरोग तज्ञ, डॉ.मनोज पाटील अस्थिरोग तज्ञ, डॉ.सौ.कृष्णा पाटील पॅथॉलॉजीस्ट, डॉ.प्रफुल पाटील जनरल फिजिशियन,डाॅ.विशाल झंवर हृदय रोग तज्ञ इ. डॉक्टर मंडळींना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या. 

    यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील, अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,  गौरव खरे जिल्हाध्यक्ष, नागेश सुरंगे जिल्हा संपर्क प्रमुख, अनिल गोठी ता. उपाध्यक्ष, धर्मेशसिंह राजपूत शहर संघटक, सै ताहेर रासप उपाध्यक्ष इ.पत्रकार बांधव उपस्थित होते.

Powered by Blogger.