Breaking News
recent

बहुजन समाज पार्टीतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मातंग समाजातील गुणवंताचा गौरव 


प्रतिनिधी

सिंदेवाही - बहुजन समाज पार्टी ,अण्णाभाऊ साठे विचारमंच व बहुजन विध्यार्थी फेडरेशन तालुका सिंदेवाहीच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी नवरगाव येथील अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नुकतेच  अभिवादन करण्यात आले .

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे विचारमंचचे अध्यक्ष प्रणय गायकवाड होती .तर अतिथी म्हणून बहुजन समाज पार्टीचे डा .रेवानन्द बाम्बोले ,उपाध्यक्ष तेजस डोंगरे, बामसेफचे प्रा .भारत मेश्राम , मायावती फेन्स क्लबच्या अध्यक्षा आम्रपाली बागेसर ,बिरसा शिवाजी आंबेडकर युवा ब्रिगेडचे अध्यक्ष इंजि.अनिकेत रामटेके ,केंद्र प्रमूख मंदा उमरे, मीनघरी ग्राम पंचायतचे सदस्य विमित दहीवले , अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष योगेश ढोंगळे ,उपाध्यक्ष रवि वानखेडे व अण्णाभाऊ साठे विचारमंचे उपाध्यक्ष मोहित बावणे आणि सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते .

  याप्रसंगी अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनाप्रीत्यर्थ  आयोजित तालुकास्तरीय अण्णाभाऊ साठे जीवनपरीक्षेत अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय पुरस्कार मिळविलेल्या  लाडबोरीची राधा पिताम्बर आंबोरकर ,नलेश्वरची  वणश्री प्रभाकर  रन्दये व  सिंदेवाहीची समिक्षा जीवनदास डोंगरे ह्या विजेत्या विद्यार्थ्यांना बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारीच्या हस्ते ट्राफी ,प्रशस्तिपत्र व बक्षिस देऊन गौरव करण्यात आला .

तसेच यावर्षीच्या बारावी व दहावी बोर्ड  परीक्षेत सिंदेवाही तालुक्यातून मातंग समाजातून सर्वप्रथम आलेल्या अनुक्रमे ज्ञानेश कनिष्ठ महाविदयाल नवरगावची  हिना रघुनाथ खंडारे  व भारत विद्यालय नवरगावची  इंद्रायणी गजानन बावणे या विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे विचारमंच व बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारीच्या हस्ते  ट्राफी व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला .


Powered by Blogger.