Breaking News
recent

शारंगधर नगरीत श्री चे आगमन भव्य स्वागत करण्यात आले


मेहकर तालुका प्रतिनिधी शिवशंकर मगर

पंढरपूर येथून परतीचे मार्गक्रम करीत असताना गण गण गणात बोतेच्या गजरात शारंगधर नगरी मेहकर येथे 

श्रींच्या पालखीचे आगमन झाले यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मांडी आणि शारंगधर नागरित  पहावयास मिळाली

आज दिनांक २९ रोज शुक्रवारला  संध्याकाळी 5.30 ला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे मेहकर शहरात आगमन झाले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने व परीसरातील शेतकरी वर्ग आज आपल्या शेतीतील कामधंदा बाजुला ठेवून मेहकर मध्ये श्री ची आगमनाची आतुरतेने वाट बघत होते वारकरी आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन श्रीचा गजर करीत व सुमधुर आवाजात भंजन व गायन करीत आंनदात वीना टाळ मृदंग  यांच्या तालात पावल्या खेळत खेळत दाखल झाले स्थानिक मेहकर शारंगधर नगरीत हार फुले व जागोजागी रांगोळी काढून मेहकर नगरी श्री चे  स्वागत करण्यासाठी मोठ्या दिमाखात सजली होती .



श्री शिवाजी हायस्कूल मेहकर येथे श्रींच्या पालखी  मुक्कामा साठी थांबली असुन वारकरी यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आज सकाळी 5:३० ला  मेहकर मधुन श्रीं च्या पालखी चे  प्रस्थान व दुपारी नायगाव येथे विसावा व संध्याकाळी जानेफळ येथे मुक्कामासाठी मार्गक्रम करीत आहे.

Powered by Blogger.