दिव्यांग व निराधारांचे अनुदान बॅंकांमार्फत लाभार्थ्यांना त्वरीत अदा करावे- दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशन ची मागणी
प्रतींनिधी
दिव्यांग बांधवांचे संजय गांधी योजनेचे व श्रावणबाळ योजनेचे अनुदान तहसील कार्यालय मलकापूर कडून 18/07/ 2022 रोजी सर्व बँकांमध्ये पाठवण्यात आले असून चार दिवस उलटूनही अद्याप बऱ्याच निराधार दिव्यांगाच्या खात्यावर बँकांनी रक्कम जमा केलेली नाही ग्रामीण भागातील बहुतांश लाभार्थी हे याच अनुदानावर आपली उपजीविका भागवत असून रोज बँकांमध्ये चकरा मारताना दिसत आहे .
परंतु पैसे जमाना न झाल्याचे सांगण्यात येत आहे तरी आपण सर्व बँक मॅनेजर यांना आदेश देऊन निराधार लोकांचे पैसे त्वरित खात्यावर जमा करण्यास सूचित करावे अशी मागणी दिव्यांग मल्टिपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.त्यावेळी दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे, सहसचिव संतोष गणगे, सदस्य अंकित नेमाडे, विवेक राजपुरे, पत्रकार पंकज मोरे, भागवत पर्वते इत्यादी सभासद उपस्थित होते.