मलकापूर प्रभाग रचनेवर आज सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका
नागेश सुरंगे मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर प्रभागरचना निर्मिती वेळी प्रभागरचना समितीने स्वतंत्र प्रभाग आहे. रचनेचा नकाशा तयार केला नाही. संपूर्ण प्रभाग रचना दिशाहीन पद्धतीने बनवण्यात आली असल्याने त्या प्रभाग रचनेस अशांतभाई वानखेडे यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर ५ जूलै रोजी सुनावणी होत आहे.
निवडणूक अनुषंगाने शहराची प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या नियम क्रमांक १५ चे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रभाग रचना निर्मिती करतांना प्रभाग क्रमांक १ नाहीत. ते ४ नंतर थेट प्रभाग क्रमांक १५ जोडला आहे. प्रभाग क्रमांक १५ ची निर्मिती करताना तो अडीच किलोमीटर अंतराचा बनविण्यात आला आहे. • प्रभागाची उलट दिशेने सुरुवात केली आहे. त्यामध्ये कोणतीही भौगोलिक सलगता नाही. इमारती, चाळीतील घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये केले आहे
नकाशातील लाल रंगाने दर्शविलेल्या प्रभागांच्या सिमंमधील सीमारेषा इमारतीवरून व घरांवरून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, जमातीच्या वस्त्यांचे देखील विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा असावा व त्या प्रगणक गट व त्यांची लोकसंख्या ठळकपणे दर्शवावी, त्यात रस्ते महामार्ग नद्या नाले, रेल्वेलाईन ठळकपणे दर्शवून त्या पद्धतीने सदर नकाशे तयार केले हा संपूर्ण घोळ क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे झालेला असून चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेस अशांत भाई वानखेडे यांनी आव्हान दिले