Breaking News
recent

श्री संत तुकाराम महाराज परतीचा पालखी सोहळा दुपारी यवत येथे विसावा घेऊन पुढे देहुकडे


 विजय कदम प्रतिनिधी दौंड

   दौंड -  श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडून  देहूकडे प्रस्थान करत असताना सकाळी वरवंड वरून निघाला  सकाळची न्याहरी चौफुला,  येथे करून दुपारी बारा वाजता यवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी दोन तास थांबला होता.

   यावेळी यवत ग्रामस्थांतर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. बरोबरच्या  वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आले होते. दोन तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळ्याचे उरूळी मुक्कामाकडे प्रस्थान झाले.  यावेळी  यवतचे सरपंच समीर दोरगे,  काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे, अशोक गायकवाड, नाना दोरगे,  दशरथ खुटवड,विनायक दोरगे, कैलास दोरगे,दत्तात्रय दोरगे,श्रीपती दोरगे, बोत्रे साहेब, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Powered by Blogger.