Breaking News
recent

सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त पेठ येथे महापूरुषांच्या विचारांची जयंती साजरी!

 


पेठ / मनोज जाधव

   दि. 1 ऑगस्ट रोजी पेठ येथे सत्यशोधक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि वीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपास्थित चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले , सभापती सौ.सिंधुताई तायडे , पेठ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य  आणि विदर्भदूत जि. प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव हे होते. या वेळी तरुण युवकांनी मोठ्या प्रामाणात हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमदार् श्वेताताई महाले यांनी यांनी आणणाभाऊ साठे यांचे कार्य त्यांचे लिखाण किती प्रेरणादाई आहे हे संगितले. 

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यांनी त्यांनी लिहिलेलि फकिरा कादंबरी ही अर्पण केली. सभापती यांनी ही मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितलं सावित्री बाई फुले यांच्या पहिल्या विद्यार्थिनी मुक्ता बाई साळवे ह्या होत्या. बाबासाहेबांमुळे स्रियांना आधिकार शैक्षणिक ,राजकीय, समान अधिकार मिळाला आहे असे सांगितले. सामाजिक कार्यकर्तें मनोज जाधव यांनी सांगिले जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव आण्णाभाऊ साठे याचे लिखाण म्हणजे इथल्या जुन्या रूढी परंपरा यावर घाव घालणारे आहे. त्यांनी कष्टकऱ्याच्या, हमालान्च्या शोषित ,पीडितान्च्या कथा आणि व्यथा जगाच्या वेशीवर टांगल्या. त्यांनी स्रियांबद्दल  लिखाण केले. असे सांगितले . यावेळी लहुजी शक्ती सेना  महिला आघाडीच्या मीनाताई तायडे, त्याच प्रमाणे ,महिला व युवक मोठ्या प्रामाणात उपस्थीत होते.

Powered by Blogger.