Breaking News
recent

नागपंचमीच्या औचित्याने म.ज्यो फुले विद्यालय दे.माळी येथे सर्पमित्र वनिता बोराडे यांचे सर्प प्रबोधन


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

     महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जगात पहिल्या महिला सर्प रक्षक म्हणून यांची ख्याती आहे अशा वनिताताई बोराडे यांचे सर्प प्रबोधन विद्यार्थ्यांसाठी व गावकऱ्यांसाठी नागपंचमीच्या पर्वावर संपन्न झाले.यावेळी सर्प संरक्षण संवर्धन व संशोधन याविषयी शास्त्रीय मार्गदर्शन वनिताताईंनी केले‌. सापा विषयीच्या अनेक अंधश्रद्धा व चुकीच्या समजुतीमुळे समाजात कशी भीती पसरत आहे व सापविषयी गैरसमज पसरत आहे हे कसे चुकीचे असल्याचे पुराव्यानिशी सर्पमित्र  डी‌ .भास्कर यांनी स्पष्ट केले‌. प्रत्येक प्रजातीचे साप हे विषारी नसतात आणि साप हा माणसाचा शत्रू नसून तो शेतकऱ्याचा खरा मित्र कसा आहे याची उदाहरणासह प्रात्यक्षिक विविध सापांच्या जाती चे वर्णन करून त्यांनी केले .त्यांच्या सर्प संशोधनाला जागतिक कीर्तीच्या नोबल पारित़ोषिका साठी नुकतेच नामांकन जाहीर झाले आहे. 

तसेच गेल्या मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वनिताताई बोराडे यांना भारतातील पहिल्या महिला सर्पमित्र सर्प रक्षक व संशोधक  म्हणून राष्ट्रीय पातळीवरील नारीशक्ती सन्मान हा राष्ट्रपती पुरस्कार महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता .



    त्याबद्दल वनिताताईंचा विद्यालय व संस्थेच्या वतीने  सत्कार किरणताई गाभणे यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वनाथ बाहेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकर गाभणे सौ.किरणताई गाभणे  सर्पमित्र ह.भ.प..डी भास्कर व  बालसर्पमित्र मानव हे देखील उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य बाहेकर यांनी साप संवर्धन व संरक्षणासाठी देश नव्हे तर जागतिक पातळीवर वनिताताई बोराडे यांनी मिळवलेली लौकीक व विविध पुरस्कार हे आपल्या संपूर्ण देशाला गौरव प्राप्त करून देणारी बाबा असल्याचे उद्गार काढले. 

    यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय राजगुरू यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल कलोरे यांनी केले कार्यक्रमाला विद्यार्थी गावकरी व शिक्षक वृंदांची विशेष उपस्थिती होती व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

Powered by Blogger.