धर्म कार्यासाठीआम्ही सदैव वारकऱ्यांच्या पाठीशी-हिंदुतेजसूर्य धनंजय भाई देसाई
![]() |
श्रीफळ देऊन दामुअण्णा महाराज यांचा सन्मान करताना हिंदुतेजसूर्य धनंजयभाई देसाई |
मेहकर तालुका प्रतिनिधी शिवशंकर मगर
दिनांक ०१/०८/२०२२ ला पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कावड यात्रेच्या निमित्ताने गुरुदेव आश्रम पळसखेड या ठिकाणी. हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूतेजसुर्य धनंजय भाई देसाई आले असताना. त्यांनी बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळ व हिंदुराष्ट्र सेनेच्या सयुंक्त बैठकी मध्ये बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आता पर्यंत च्या कामाचा आढावा घेतला.
वारकरी महामंडळाने गोर गरीबां ला केलेली आर्थिक मदत असेल.दवाखान्याच्या संदर्भात केलेली मदत असेल. उघड्यावरील मांस विक्री प्रकरण असेल. कोरोना काळातील अन्न व मास्क वाटप असेल. बुवाबाजी च्या नावाखाली सुरु असलेले हिंदु व इतरांचे धर्मांतरण . वारकरी कलावंताच्या मानधना बाबत. वारकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी. ज्या गावात आजपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला नाही अशा गावात सप्ताह सुरू करणे.
अशा विविध विषयावर वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे आणि धनंजय भाई देसाई यांची सविस्तर चर्चा झाली. आणि पुढील काळात मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्या मध्ये भव्य दिव्य हिंदुधर्म जागरण सभेचे आयोजन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाच्या कार्याचे धनंजय भाई देसाई यांच्या कडून कौतुक करण्यात आले व त्यांनी दामुअण्णा महाराज शिंगणे यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी देसाई साहेब बोलताना म्हणाले की. तुम्ही करीत असलेल्या धर्म कार्यासाठी अडचण आल्यास कधीही आवाज द्या मी खंबीरपणे वारकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे.
या प्रसंगी दामुअण्णा महाराज शिंगणे. किरण महाराज शिंदे. विदर्भ संघटक. भाजपा नेत्या मंदाकिनी ताई कंकाळ. सीताराम महाराज ठोकळ. भागवत महाराज माळेकर मेहकर तालुका सचिव. गजानन महाराज ठेंग विदर्भ मार्गदर्शक. वैभव महाराज मानतकर. शरद महाराज काळे. पंजाबराव महाराज बिल्लारी. संतोषराव महाराज खडसे. काशिनाथ महाराज बाहेकर समाधान महाराज पाबळे. गजानन महाराज गुडघे. आकशजी भुतेकर. कृष्णाजी कुसुंबे आदी वारकरी महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.