किर्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यक्ष व शिक्षक वृंद यांच्या हस्ते वृक्षारोपण
प्रतिनीधी (शिवाजी खंदारे)
किर्ला ता. मंठा येथील जि.प. प्राथमिक शाळेत सतत कोणते ना कोणते शिक्षक व अध्यक्ष हितावह उपक्रम राबविण्यात येतात. नव्यानेच झालेल्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपक्रमा अंतर्गतही विविध उपक्रम राबविण्यात आले. सोमवार, ०८ आॅगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवल खंदारे व उप अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवल खंदारे व सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवल खंदारे म्हणाले,की झाडांपासून अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन शरीरासाठी खूपच लाभदायक असून, ऑक्सिजन लेवल वाढण्यास मदतही होते. त्यामुळे वृक्षलागवडीस महत्त्व देऊन, त्याची जोपासनाही करावी. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खरात सर.यांनी प्रास्ताविक केले.
मोठया उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. गतवर्षी जगलेली झाडांचा वाढदिवस देखील मुलांनी उत्साहात साजरा केला. यावेळी सर्व विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. तसेच शाळेतील मुलांनी वक्षरोपणाचा आनंद घेतला. त्याच बरोबर गतवर्षी जगलेली वृक्षांचे देखील आम्ही संगोपण करु असे सुनील चव्हाण यांनी दैनिक अहिल्याराज शी बोलतांना सांगितले. शाळेतील माजी विध्यार्त्यानी शाळेस सतत मदतीचे आश्वासन देऊन शाळा सुविधा व गुणवत्ता वाढीचा वसा घेतला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक उपस्थित होते यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगुन सर्वांचे आभार मानले.विजय राठोड सर यांनी सांगितले की.
मागील वर्षी लावलेली झाडे जगली त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. या वर्षी लावलेली झाडे देखील आम्ही सगळे जण मिळून चांगल्या प्रकारे जगवु. - विद्यार्थ्यांनी या आधी शाळेत वृक्ष वाटिका बनविले होते. आपल्या आजुबाजूच्या परिसरात हे सिडबॉल रुजन्यासाठी टाकण्यात आले होते. लावलेल्या झाडांची योग्य काळजी व देखभाल करून संवर्धन करु. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक खरात सर यांनी सांगितले की शालेय जीवनामध्ये विदयार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
अलीकडे होत असलेली पर्यावरणाची ऱ्हास मानवासाठी अत्यंत घातक ठरत आहे, परिणामी आपल्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, म्हणुनच आपण पर्यावरण संवर्धन केले पाहिजे असे ही मुख्याध्यापक खरात सर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री.नवल खंदारे व श्री. सुनील चव्हाण, मुख्याध्यापक खरात सर, सह शिक्षक नागरे सर, विजय राठोड सर, बाहेकर सर, राठोड सर, व पालक विनोद बांडगे, अल्ताफ पठाण, पांडुरंग लोखंडे, अन्सर पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.