जळगावच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण महिनाभरापूर्वीची भेट ठरली शेवटची
![]() |
जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावातील जवानास वीरमरण आले आहे. त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जळगाव- जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावातील जवानास वीरमरण आले. नायब सुभेदार विपीन खर्चेअसे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. खर्चे यांचा आज (सोमवार) मोटासायकल दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
आजरात्री उशिरा त्यांचे पार्थिव निमखेडी गावात पोहचणार आहे. उद्या मंगळवारी दि. ९ रोजी त्यांच्या गावी सकाळी ८.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निमखेडी येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रूक विपीन जनार्दन खर्चे हे यांच बारावीपर्यंत शिक्षणगावातच झाले. त्यानंतर ते लगेचच २ फेब्रुवारी २००० मध्ये सैन्य दलात भरती झाले. विविध ठिकाणी त्यांनी सैन्यदलात सेवा बजावली. आग्रा येथे असतांना वर्षभरापूर्वीच त्यांची नायब सुभेदार या पदावर पदोन्नती झाली होती. दरम्यान, त्यांचा सेवेचा कालावधी संपलेला होता. मात्र त्यांनी देशसेवेसाठी पुन्हा आपला कालावधी वाढवून घेतला होता.