अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी करावी-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांचे आदेश
प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलडाणा भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार कार्यालय प्रमुखांनी अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले आहे.
मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडण्यासाठी व्होटर हेल्पलाईन हे ॲप प्ले-स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावे. वोटर रजिस्ट्रेशन क्लिक करावे. फॉर्म 6 ब ला क्लिक करावे. लेट्स स्टार्ट ला क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा. व्होटर आयडी असेल तर येस आय हॅव व्होटर आयडी हे निवडावे. व्होटर आयडी नंबर टाकून महाराष्ट्र राज्य निवडावे. नंतर प्रोसिड क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. डन करून कन्फर्म क्लिक करावे. त्यानंतर आधार निवडणूक ओळाखपत्राला लिंक झाल्याचा मॅसेज आणि रेफरंस नंबर येणार आहे. कार्यलयप्रमुखांनी वरील पद्धतीचा अवलंब करून अधिकारी, कर्मचारी यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.