Breaking News
recent

तहसिलदारांच्या फायलितील महत्वाचे कागदपत्र गहाळ करणार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा !भाई राजेश इंगळे यांची मागणी



    मलकापुर प्रतिनिधी

स्थानिक तहसिल कार्यालयातील तहसिलदारांच्या फायलीतील महत्वाचे कागदपत्र गहाळ करणार्या कर्मचार्याविरुद्ध सार्वजनिक अभिलेख अधिनियनानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भाई राजेश इंगळे यांनी तहसिलदार सुरडकर यांचेकडे केली आहे .

    याबाबत सविस्तर बातमी अशी की, मलकापुर भाग 1मधील बुलढाणा रोडवरील नुतन शाळेसमोरील ग.नं.187/3अ जमिनीवर व्यापारी संकुलाचे काम सुरु ही जमिन अमृतलाल रामलाल मुंधडा ट्रस्ट व लोकसेवा शिक्षण मंडळाच्या नावावर होती .अमृतलाल मुंधडा ट्रस्टने त्याच्या जमुनीची महसुल कायद्याच्या कलम 42 ब नुसार अकृषिक सनद घेण्यासाठी तहसिलदार मलकापुर यंचेकडे अर्ज केला होता अर्जानुसार तत्कालिन तहसिलदार कु.स्वप्नाली डोईफोडे यांनी महसुल प्रकरण तयार करुन ट्रस्टला सनद दिली आहे .सदर प्रकरणात फार मोठा घोळ व भ्रष्ट्राचार झाल्याची माहिती भाई राजेश इंगळे यांना मिळाल्यावरुन त्यांनी सदर प्रकरणाच्या नकला मिळण्यासाठी तहसिलदार मलकापुर यांचेकडे अर्ज केला असता प्रकरणातील रोजनाम्यावर नमुद कागदपत्रापैकी अनेक महत्वाचे कागदपत्र गहाळ असल्याचे दिसुन आले तर कलम 42 ब ची सनद देण्यासाठी नियमानुसार सादर करावी लागणारी कागदपत्रेही दाखल केलेली नसल्याचे दिसुन आले आहे .त्यामुळे प्रकरणातील कागदपत्र गहाळ करणार्या  कर्मचार्याविरुद्ध सार्वजनिक अभिलेख अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी भाई राजेश इंगळे यांनी तहसिलदार सुरडकर यांचेकडे केली आहे .

        या प्रकरणात 42 ब नुसार सनद मिळविण्यासाठी मुंधडा ट्रस्ट ने दि.7/10/19 रोजी अर्ज दिला आहे . नियमानुसार शासकीय भरणा करण्यासाठी ट्रस्टला दिलेल्या पत्रावर तहसिलदार यांनी तारीखच टाकलेली नाही.तर ट्रस्टने 12/12/2017रोजी म्हणजे अर्ज देण्याआधी दोन वर्षे अगोदरच शासकीय रकमेचा भरणा केला आहे . यावरुन तत्कालिन तहसिलदार डोईफोडे यांनी संगनमताने खोटे व बनावट प्रकरण बनऊन शासनाची फसवणुक केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी लवकरच न्यायालईन कारवाई करण्यात येईल अशी माहिती भाई राजेश इंगळे यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे दिली आहे .

Powered by Blogger.