यवत येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी सर्वत्र साजरी
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त यवत ग्रामपंचायत येथे विद्यमान सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुभाष यादव यांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करत आपले विचार मांडताना सांगितले की महापुरुषांचे विचार नाचून नाहीतर वाचून डोक्यात आत्मसात केले पाहिजेत . झोपडपट्टी सुरक्षा दल अध्यक्ष दत्तात्रय डाडर यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट मांडत असताना अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी व स्मशानातील सोने या कथेतील नायक भीमा याचा जीवनपट थोडक्यात मांडला यावेळी बोलताना डाडर यांनी महापुरुषांच्या कादंबऱ्या चरित्र वाचून जीवनाला योग्य दिशा मिळाल्या शिवाय राहत नसल्याचे सांगत मार्गदर्शन केले. यावेळी दौंड तालुका सोशल मिडीया मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष पत्रकार विनायक दोरगे, मातंग नवनिर्माण सेना अध्यक्ष काळुराम शेंडगे, काँग्रेस अध्यक्ष अरविंद दोरगे , बापूसाहेब जगताप ,राहुल कुदळे, संजय अडागळे, सिद्धार्थ भालेराव , उपस्थित होते.
यवत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश जाधव यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश शेंडगे, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यवत पोलीस स्टेशन येथे अण्णाभाऊ साठे ,लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ठाणे अमलदार संभाजी कदम, गुप्त विभाग प्रमुख बापूसाहेब जगताप महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होत्या.
यवत येथील विद्या विकास मंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांनी सतीश सावंत सर, व सर्व महिला व पुरुष शिक्षक यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी विद्यार्थी शिक्षक व प्रमुख पाहुण्यांनी आपल्या विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी श्रावणी थोरात हिने केले तर रोहन पात्रे यांनी महापुरुषां विषय अतिशय अभ्यासपूर्ण असे विचार मांडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.