कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
मलकापूर प्रतिनिधी
1 ऑगस्ट महसूल दिन, महाराष्ट्र शासनाचा मध्यवर्ती विभाग समजल्या जाणार्याा महसूल विभागाच्या महसूल वर्षाचा पहिला दिवस यादिनी महसूल खात्याशी संबंधित यंत्रणेच्या बाबींचा निवडा होणे अपेक्षित असल्याने महसूल विभागाचा शेवटचा घटक समजल्या जाण्यार्याद कोतवालांना न्याय मिळण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे ता अध्यक्ष सुरेश दाते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त होत आहे.
याबाबत असे की महसूल विभागाचा गाव पातळीवर 24 तास काम करणारा एक महत्वाचा घटक असून प्रशासन व शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे गावपाटलीवर ग्रामस्थ व शेतकर्यांषना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, मुनदी देणे ,चर्चा करणे, पीक विमा ,ई पीक पाहणी आदि सारख्या उपक्रमाच्या अंबलबाजवणी प्रशासनाला सहकार्य व शेतकर्यांधना मदत व मार्गदर्शन करणे, पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीची कामे करणे,शेतकरी आत्महत्या,इतर आत्महत्या , आकष्मात होणारे मृत्यू प्रकरणे,पावसामुळे किंवा दुष्काळामुळे किंवा आकष्मात कोसळणार्या संकटाची,किंवा झालेल्या हाणीची प्रशासनाला माहिती देणे. आदि कामे ग्रामस्थ व शेतकर्यांलसाठी करीत असतात.
शेतसारा महसूल गोळा करणे. गावपातळीवर {बी एल ओ}ग्रामस्थरिय मतदान अधिकारी म्हणून काम करणे. राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाद्व्रारा घेतल्या जाणार्या{ निवडणुकांमध्ये 24 तास वरिष्ठांच्या आदेशानुसार कामे करणे. वि तहसिलदार साहेबांच्या आदेशाने तहसीलस्तरावर नक्कल विभाग. जनगणना विविध शाखेतील कामे, पुरवठा विभागातील कामे,निवडणूक विभागातील कामे,आवक जावक विभागातील कामे. संजय गांधी विभागातील कामे,यासारखी असंख्य कामे प्रशासनाला सहकार्य करण्याची कामे लेखी आदेशाने किंवा तोंडी आदेशाने करीत असतो.
ब्रिटिश काळापासून कार्यरत कोतवालांना 7500 रु इतके तुटपुंजे वेतन मिळत असून ते किमान वेतांनाच्या निम्मे इतके आहे एकीकडे 24 तासांच्या कामाची अपेक्षा असताना तुटपुंज्या मानधनात उदरनिर्वाह करणे कठीण आहे. यासाठी कोतवालांना न्याय मिळण्यासाठी खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत.
1 कोतवाल कर्मचारी बांधवांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनाचा दर्जा देण्यात यावा,
2 कोतवाल कर्मचारी बांधवांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनाचा दर्जा मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असेल तर तोपर्यंत कोतवाल कर्मचारी यांना सरसकट 25000/-रुपये इतके वेतन देण्यात यावे,
3 कोतवाल कर्मचारी हे वयाचे 60 व्या वर्षी निवृत्त होतात त्यांना सेवानिवृत्ती नंतर 10.00000/-रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा
4 कोतवाल कर्मचारी यांना सेवा निवृत्ती नंतर 10.000/-रुपये पेन्शन मिळणे बाबत
5 कोतवाल यांचा कोतवाल संवर्गातून शिपाई संवर्गात पदोन्नती संदर्भातील 40%कोटा वाढवून तो 100%करण्यात यावा
6 कोतवाल कर्मचारी यांना तलाठी कामाचा व महसूल सहाय्यक कामाचा अनुभव असल्यामुळे तलाठी व तत्सम पदांसाठी25%आरक्षण देण्यात यावे.