Breaking News
recent

माळी समाज संघटना चिखली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न



प्रतिनिधी/भरत जोगदंडे

 चिखली शहरात माळी समाज संघटनेच्या वतीने १० वी, १२ वी. व विविध शैक्षणिक क्षेत्रातील उच्चशिक्षणमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवे यापुढे नवनवीन यश असेच संपादन करावे अशा विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण सत्कार सोहळा हा सावित्रीच्या लेकी यांच्या हस्ते करण्यात आला हे विशेष. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षीका सौ. वैशालीताई वानेरे प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. ज्योतीलाई खरात तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जयाताई नन्हई, प्रा. शिलाताई सपकाळ, डॉ. प्रितीताई जाधव, प्रा. अम्वीनीताई खरात, सौ. अनुराधालाई खरात डॉ. उज्वलाताई मेहेत्रे, डॉ. भराड, डॉ. माधुरीलाई मोने, अंड स्नेहलताई भराड, सौ. जयश्रीताई देशमाने, सौ. पद्माताई सपकाळ, ह्या होत्या. या वेळी काही विद्यार्थ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये · मानसी सुनील इंगळे, कु. प्राची दिपक देशमाने. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. ज्याती खरात यांनी समाजातील विद्यार्थ्याचे भरभरुन कौतुक केले व पुढील शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणातून बोलतांना प्रा. वैशालीताई वानेरे यांनी आपल्या समाजातील मुल हे आता विविध शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असून त्यांनी अशाच जिद्द व चिकाटीन परिश्रम करून यश संपादन करावे अशी इच्छा व्यक्त करुन योग्य मोलाचे विद्यार्थ्याना भार्गदर्शन केले.

प्रकाश सपकाळ, रामेश्वर मेहेत्रे, भारत खरात कैलास जंगले, राजु जुमडे, सुरेश देशमाने, यादव भाराड, डॉ. अजय अवचार, प्रल्हाद बांडे, दीपक गिन्हें सर. ज्ञानेश्वर महेत्रे, सुचित भराड, यानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन रामेश्वर मेहेत्रे तर आभार राजु जुमडे यांनी केले.


Powered by Blogger.