Breaking News
recent

अपंग जनता दल संघटनेच्या मुंबई ई मंत्रालय येथील आंदोलनाला मिळाले यश



महाराष्ट्रातील दिव्यांगांचे संजय गांधी पेन्शन आता होणार मासिक दोन हजार रुपये सामाजिक न्याय व विशेष साह्यय विभाग महाराष्ट्र शासनाचे सचिव सुमंत भांगे यांचे दिव्यांगांना आश्वासन

मलकापुर प्रतिनिधी

अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यातील दिव्यांगांचा जिवनावशक मागण्यांसाठी मुंबई आझाद मैदान येथे दि. 17 ऑगस्ट रोजी अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृवात एक दिवशीय दिव्यांगांचे धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलन ची दखल घेत राज्य शासनाने संघटनेच्या मागण्या संबंधित अधिकारी यांना मंत्रालय मध्ये बोलावून सर्व मागण्यांवर एक तास सविस्तर चर्चा करुन लवकर या मागण्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी  सुमंत भांगे (सचिव सामाजिक न्याय व विशेष साह्यय विभाग महाराष्ट्र शासन) यांचा अध्यक्षेत बैठक बोलाविण्यात आली.


   यावेळी ओमप्रकाश देशमुख अपंग कल्याण आयुक्त पुणे व नंनवरे  समाज कल्याण संचालन पुणे व अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे व्यवस्थापक अध्यक्ष अनीस पत्रकार, राज्य अध्यक्ष विजय काका कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष आनंद पाटील,राज्य सचिव कलीम शेख, मो शकील सादीक बागवान सामाजिक न्याय व विशेष साह्यय विभाग महाराष्ट्र शासनचे सचिव सुमंत भांगे यांचेशी झालेल्या चर्चेत वाढती महागाई पाहता संजय गांधी निराधार पेन्शन धारकांना दिले जाणारे मासिक पेन्शन एक हजार रुपये हे फारच अल्प प्रमाणात असुन त्यात महिनाभराचा गुजारा होत नसल्याने मासीक पेन्शन पाच हजार रुपये करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावर चर्चा करतांना न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मासिक पेन्शन दोन हजार रुपये करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासन दिले.

   त्याचप्रमाणे राज्यातील दिव्यांगांचा जीवनावशक मागण्या घरकुल,रोजगारासाठी प्रत्येक योजनेत 5% आरक्षण,शेतकऱ्यांप्रमाणे दिव्यांगांचे थकीत कर्ज माफी तसेच दिव्यांगसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला रोजगार उभारणी करीता जागा,  दिव्यांगांचा अंत्योदय योजनेत समावेश,दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय अश्या संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा झाली न्यायविभागाचे सचिव यांनी आश्वासन देत संघटनेची प्रत्येक मागणी लवकरत लवकर निकाली काढण्यासाठी यावे  सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश काढणार असल्याचे सांगितले. यावेळेस संघटनेचे अपंग नेते शेख अनिस पत्रकार व अपंग जनता दल सामाजिक संघटना राज्य अध्यक्ष विजयकाका कुलकर्णी,राज्य उपाध्यक्ष आनंद पाटील, राज्य सचिव कलीम शेख यांच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Powered by Blogger.