Breaking News
recent

विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना सामाज भूषण पुरस्काराने सन्मानित



जळगाव जा  सागरकुमार झनके 

एम.सी.एन.न्युज च्या नव्या वर्धापण दिनानिमित्त 28 आँगष्ट रोजी सहकार विद्यामंदिर जळगाव जामोद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात, जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदिप मोरे यांना त्यांच्या कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एम.सी.न्यूजच्या वतीने सामाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,दरवर्षी ए.सी.एन.न्यूजच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तीचा चँनलचे  मुख्य संपादक श्यामकुमार तायडे,संपादक राजीव वाढे यांच्या वतीने सामाज भूषण पुरस्कार प्रदान केल्या जातात.यावर्षी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटविनाऱ्या,आपल्या पदाला,कार्याला प्रामाणिक राहून,शासकीय सेवेत एक उच्च पदस्त अधिकारी असतांना समाजभान जपत कार्य करणारे  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी,संदिप मोरे,शिक्षण विस्तार अधिकारी फाडके साहेब,अकोला जिल्ह्यातील महान पिंजर येथील जीवरक्षक  संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना यावेळी सामाज भूषण गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले...

   खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरला विस्तार अधिकारी संदिप मोरे यांचा पुरस्कार सोहळ्याच तो क्षण...सर्वांचे लक्ष वेधून घेणारा तो क्षण याची देही यांची डोळा सर्वांनी अनुभवला...सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमाबाबत जेव्हा ह्या पुरस्काराबद्दल जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण,आदिवासी भागात जेव्हा  संदीप मोरे साहेबांना पुरस्कार मिळणार ही बातमी समजली,तेव्हा आदिवासी बांधव, अनेक लाभार्थी, ग्रामस्थ, ग्रामसेवक, केंद्र चालक, रोजगार सेवक, सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी,सर्व  सरपंच व संघटना यांच्या सह साहेबांना मानणाऱ्या सर्व लोकांना आनंद झाला ऐवढेच नाही प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान करण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली... साहेबांचा  गुणगौरव पुरस्कार सोहळा सर्वांनी अनुभवला..!


     शासकीय अधिकाऱ्या  बाबत नेहमीच सामान्य जनतेच्या मनात गैरसमज  असतात.अधिकारी, कर्मचारी म्हटलं की जनतेच्या मनात त्यांच्याप्रती प्रचंड राग असतो,सर्वच अधिकारी सारखे नसतात..अनेक अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत असतात. त्याचेच जीवंत उदहारण म्हणजे पंचायत समिती जळगाव जामोद चे कर्तव्यदक्ष,आपल्या पदाला न्याय देणारे,सुपरिचित व्यक्तीमत्व विस्तार अधिकारी संदीप मोरे...!या निमित्त याची प्रचीती वर्धापन दिनी आली.समाज भूषण सन्मानाने पुरस्कृत केल्याने  प्रामाणिक अधिकारी सुद्धा असतात याची प्रचिती यावेळी झाली. 

   सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी मंत्री,विद्यमान आमदार डाँ.संजय कुटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार योग्यच आहे.फक्त पत्रकारांनी बातमीची शहानिशा करून शंबर टंक्के बातमी खरी याची दक्षता घेवूनच बातम्या प्रसारित केल्या पाहिजेत...यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पो.नि.सुनील अंबुलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रसेनजीत पाटील,काँग्रेस पक्षाचे नेत्या स्वातीताई वाकेकर, तहसीलदार वरणकार या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून एम.सी.एन न्युजला शुभेच्छा दिल्या.

    सत्कारला उत्तर देतांना संदिप मोरे यांनी सांगितले की,घरची परिस्थिती अत्यन्त हलाखीची असतांना मी शिक्षण घेतले आणि नोकरीवर लागलो.अत्यंत प्रतीकुल परिस्थितीवर मात करत मी इथप्रयंत आलो.त्यामुळे आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत सामाजिक भान जपत,एक विषेश सामाजिक कार्य म्हणून ११ विद्यार्थ्यांचा उच्च शीक्षणासाठी त्यांना स्पर्धा परिक्षेची विविध पुस्तके आणि त्यांना लागणारी आथिर्क मदत मी  करत असतो.

  जून 2016 ला रुजू झालो तेव्हा स्वच्छ भारत मिशन चा गावो गावी प्रचार, प्रसार करणे,कोणताही शासन निर्णय असो सर्व प्रथम अमलबजावणी करण्याचा प्रयत्न सातत्याने प्रयत्न करतो.त्यासाठी सर्व ग्रामसेवकांच्या मदतीमुळेच मी हे करू शकतो.बेघरांना घरे देण्याबाबत राज्यातून 900 च्या जवळपास बेघराना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावोगावी जाऊन ग्रामपंचायतचा पाठपुरावा करून अतोनात प्रयत्न केले व त्या लोकांचे हक्काचे घर मिळवून दिले.एस.डी.ओ.धनंजय गोगटे व बी.डी.ओ.सोनवणे असताना राज्यातील पहिले प्रकरण करण्याचा मान मी मिळविला.पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल साठी जागा खरेदी अर्थ सहायय योजनेत 200 लाभार्थीना रु 50000 पर्यंत जागा मोबदला मिळून दिला. येनगाव येथे 2017 ला आगीत खाक झालेल्या 13 लोकांना जागा मिळून देण्यासाठी  350000 रूपये शासनाच्या योजनेतून देऊन त्यांना घरे दिले.

   हे सुद्धा राज्यातील पहिलेच प्रकरण होते. सोंनबर्डी, इस्लामपूर या गावात कित्येक वर्षांपासून जागेचा प्रलंबित प्रश्न होता एस.डी.ओ.वैशाली देवकर मँडम आणि तहसीलदार सोलाट मँडम व बी.डी.ओ.भारसकळे यांचे कडून मार्गी लावून घेतला.मोहीदेपुर सारख्या ठिकाणचा प्रश्न एकाच वेळी मार्गी लावून 46 लोकांना जागा उपलब्ध करून घेतली व त्यांचे हंक्काचे घराचे मिळवून दिले.लाभार्थी्यालाला अडचण आल्यास स्वतः बँकेत राजीष्ट्रर ऑफिस येथे जावून त्यांच्या अडचणी सोडवल्या. अनेक गावांत मी पुढाकार घेऊन अभ्यासिका सुरू केली सर्व जातीचे मुलं एका ठिकाणी येवून तीथे अभ्यास करतात. कोरोना काळात अनेक गरजूना स्वखर्चाने धान्य पुरवले.

  आपल्या कार्यालयातील 101 कर्मचाऱ्यांचे रक्तदान आपले सहकारी याना आवाहन करून करून घेतले. कोरोना काळात कर्मचारी उपस्थती अल्प ठेवण्याचे निर्देश असताण दररोज कर्त्याव्यवर हजर राहून ग्रामीण भागात फिरत राहलो.बी.डी.ओ  व सी.पी.डी.ओचा प्रभार यशस्वी रित्या सांभाळून ग्रामीण भागातील जनतेची कामे मार्गी लावली, क्रीडा स्पर्धेत आपल्या सहकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात बक्षिसे पटकावल.सातपुड्याचा डोंगरात वसलेल्या गोमाल या गावासाठी वन विभागाकडून शाळेसाठी जागा मिळवून दिली.पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, सरपंच,ग्रामसेवक ,ऑपरेटर, रोजगार सेवक,व ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यानेच मी हे करू शकलो आणी पुढेही असेच कार्य करत राहिल.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव,ग्रामसेवक,आणि सरपंच संघटना आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Powered by Blogger.