डिपी तात्काळ तेथून हटवून इतरत्र हलविण्यात यावी- प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
मलकापूर- माता महाकाली रोडवर असलेली विद्युत डिपी ही वाहतुकीस अडचण निर्माण करणारी ठरत असून या डिपीमुळे एखादवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर डिपी तात्काळ तेथून हटवून इतरत्र हलविण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांतीच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता वीज वितरण मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, माता महाकाली रोडवर वीज वितरण वंâपनीची विद्युत डिपी असून ही डिपी वाहतुकीला अडचण निर्माण ठरत आहे. माता महाकाली रोड हा रहदारीचा रोड असून वीज वितरणची डिपी ही मधातच आलेली असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच एखादवेळी या डिपीमुळे अपघात होवून अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरची डिपी त्याठिकाणावरून हटवून इतरत्र स्थलांतरीत करण्यात यावी. जेणे करून वाहतुकीस निर्माण होणारी अडचण दूर होईल. त्यामुळे सदरची डिपी तात्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांतीच्या वतीने करण्यात आली.
सदर निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह प्रहार अपंग क्रांती महिला तालुका प्रमुख कु.शुभांगी डवले, शहर प्रमुख शालीकराम पाटील, तालुका प्रमुख अजित पुंâदे, शहर उपप्रमुख नितीन खंडारे, अपंग क्रांती तालुका प्रमुा राहुल तायडे, योगेश बावस्कर, बळराम बावस्कार, राहुल चित्ते, किशोर चित्ते, राजेंद्र तांदुळकर, नटराज मिल्क कॉर्नर, श्रीसमर्थ मेडीसीन्स, पुजा प्रोव्हीजन, अनिल श्रीनाथ, दिपक चित्ते, भगवान वखरे, पांडुरंग भोकरे, सचिन नारखेडे, रविराज जेन्टस् पार्लर, रविंद्र गिरी, शुभम जाधव, गौरव सुपारी भांडार, सागर पाटील, अशोक गाढवे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षNया आहेत.