Breaking News
recent

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त स्वाभिमानी वतीने अभिवादन

 


शेगाव प्रतिनिधी

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्य स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने अभिवादन करण्यात आले. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यंदाचे वर्ष जन्म शताब्दी म्हणून साजरा होत आहे. माघील कोरोना काळात शताब्दी वर्ष  साजरे करता आले नाही. साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे जागतिक कीर्तीचे साहित्य साहित्यिक होते. अण्णाभाऊ साठे बहुजन समाजाचे कलावंत होते. जीवनाच्या विद्यापीठातून घामाच्या संस्कारातून, कष्टाच्या काट्याकुट्यातून आणि मानवाच्या मोठेपणाच्या ध्यासातून त्याच्यातला लेखक घडला होता. वारणा खोऱ्यांचे वाटेगावच्या पंचक्रोशीतल्या मातीचे विविध रंग त्यांच्या व्यक्तिमत्वाला लाभले होते. अण्णा भाऊच्या लेखणीतून 

तेरा कथा संग्रह, दोन नाटके, चौदा लोकांनाटके,पस्तीस कादंबऱ्या, दहा पोवाळे, कदाबरीवर आधारित सात चित्रपट, एक शाहीर, हे पुस्तक, आणि एक रशियाच्या प्रवासाचे प्रवासवर्णन, अशी विपुल शब्द संपदा अण्णा भाऊंच्या नावावर आहे. त्यांच्या लेखनीतुन त्यांनी कष्टकऱ्यांची व्यथा मंडली आहे.दारिद्र भूक, बहिष्कार, दुरावा कष्टकऱ्यांन वर्ती येणाऱ्या परिस्थिचे वर्णन त्याच्या काव्यलेखन पोवाळे, लावल्या, गिते, पदे, छक्कळ,, गाणी, सवाल -जबाब, वर्णनपर आणि भाष्यात्मक निवेदनपर पद्धती मध्ये  दिसते. त्यांनी समाजाला दिलेलेल्या क्रांतीकारी विचार व सामाजिक बांधिलकी पेरणा देतात असे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल बोलताना म्हणाले .

Powered by Blogger.