कनिष्ठ अभियंता कार्यालयाचा विजपुरवठा कट करण्याचा ईशारा देताच तार ओढून डि.पी.वरुन लाईट पुर्वरत सुरू
मलकापुर प्रतिनिधी
तालुक्यातील रणगांव शिवारातील बढे डि.पी.वरील तार दहा दिवसांपुर्वी तुटल्याने बढे डि.पी.वरील शेतकऱ्यांची लाईट गेल्या दहा दिवसांपासुन बंद असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी उपलब्ध असतांनाही ते लाईट अभावी बागायती पिकांना देता येत नव्हते,गुरा ढोरांना हि पिण्याच्या पाण्यासाठी भिषण पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी लाईनमन, वायरमन, कनिष्ठ अभियंता वानखेडे यांना डि.पी.वरील तुटलेला तार जोडण्यासाठी सांगितले
आज जोडू, उद्या जोडू करता - करता दहा दिवस उलटले पण डि.पी.वरील तार न ओढल्या गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती शिवसेना पदाधिकारी गजानन ठोसर यांना सांगितली ठोसर यांनी क्षणाचाही विलंब न करता कनिष्ठ अभियंता वानखेडे यांना भ्रमणध्वनीवरुन म.रा.वि.वि कंपनी कडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जाब विचारत तात्काळ त्या डि.पी.वरील विद्युत तार आजच्या आज न जोडल्यास उद्या शेतकऱ्यांसमवेत येऊन म.रा.वि.वि कंपनी कार्यालयाचा विद्युत पुरवठा कट करण्याचा इशारा दिला.
शिवसेना व शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याच्या धास्तीने कनिष्ठ अभियंता वानखेडे यांनी दुपारीच लाईनमन, वायरमन यांना रणगांव येथे पाठवून बढे डि.पी.वरील तुटलेला तार जोडल्याने त्या डि.पी.वरील शेतकऱ्यांची लाईट पुर्ववत सुरू झाल्याने त्या शेतकऱ्यांनी शिवसेना पदाधिकारी गजानन ठोसर यांचे आभार मानले.