निमकराळ येथे विज पडून दोघांचा मृत्यू,तर एक महिला जखमी.
सागरकुमार झनके
जळगाव जा : 20 आँगष्ट रोजी दुपारी विज पडून निमकराळ येथील दोघांचा मृत्यू तर एक महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घडली घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,20 आँगष्ट रोजी दुपरच्या वेळी जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ आडोळ, मांडवा, तीवडी, गौलखेड, दादुलगाव या परिसरात अचानक आकाषात ढगांचा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली.अचानकपणे आकाशात काळेकुट्ट ढग जमा होवून काही क्षणात पावसाला सुरुवात झाली.मेघगर्जनेसह झालेल्या या पावसात मोठ्या प्रमाणात विजा चमकत होत्या तर मोठ्या प्रमाणात हवा होती.
सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे वय 22 वर्ष,मधूकर तुळशुराम उगले वय 56 वर्ष आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर ऊगले वय 48 हे तीघेही शेताता काम करत होते.अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली.पावसापासून बचाव व्हावा म्हणून तीघांनीही शेतातील झाडाचा आसरा घेतला.पण नियतीच्या मणात मात्र वेगळेच होते.अचानक त्या झाडावर विज पडली आणि झाडाखाली असलेल्या अमोल पिसे आणि मधूकर उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यमुना ऊगले ह्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे