नांदुरा तालुक्यातील युवकांनी घेतला राष्ट्रीय बजरंग दल मध्ये प्रवेश.
युवकांना सोबत घेऊन धर्म सेवेचं काम गावागावात पोहोचवेल-जीवनसिंग राजपूत
नांदुरा प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल हिंदुरुदयसम्राट डॉ. प्रवीणभाई तोगडियाजी यांच्या नेतृत्वाखाली देशभर संघटन विस्तार सुरू आहे विदर्भ प्रांत महामंत्री किशोरजी दिकोंडवार विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुपजी जयस्वाल यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्ह्यात गावागावात शाखा ओपनिंग व धर्म जनजागृती चे काम जिल्हाध्यक्ष जीवनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे .
धार्मिक सामाजिक गोरगरिबांची सेवा मदत करण्याचे काम जिल्ह्यामध्ये चालू असताना त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आज नांदुरा तालुक्यातील असंख्य युवकांनी राष्ट्रीय बजरंग मध्ये जाहीर प्रवेश घेतला, नांदुरा तालुका अध्यक्षपदी आदित्य सरोदे तर उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड गोरक्ष प्रमुख आकाश सावंत कार्यकारणी सदस्य योगीनाथ सावंत असे जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्यावेळी उपस्थित गणेश सरोदे, मंगेश तायडे, प्रशांत खोले अनंता सरोदे, वैभव वावगे, आशिष सातव गणेश शेळके रवींद्र सावंत व आदी बजरंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते