कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
नांदुरा/प्रतिनिधी
दि.१. कोतवाल हा ग्राम पातळीवरील २४ तास सेवा देणारा गाव कामगार आहे. दवंडी देणे, विमा, ई.पीक पाहणी, नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे घरांचे नुकसान,ग्राम पातळीवरील शेतकरी, गावकरी यांना ई. प्रशासनाच्या विविध योजना विषयी माहिती देणे असो की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करणे असो. उन्हाळा ,पावसाळा ,हिवाळा न बघता शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यां च्या हितासाठी सदैव तत्पर सेवा देणारे ग्राम पातळीवरील कर्मचारी म्हणजे, कोतवाल. कुणाची आत्महत्या असो, शेतसारा महसूल गोळा करणे असो, यासारखे अनेक सांगण्यासारखे कामे आहेत, परंतु कोतवाल यांना मानधन किती? तुटपुंजे ७५००-/रुपये वेतन मिळते.
७५०० रुपये वेतना म्हध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?. मुलांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न, आजच्या काळातील महागाई नुसार एवढ्या वेतनात कसे भागणार?. असे कोतवाल कर्मचाऱ्यांचे एक ना अनेक प्रश्न आहेत. त्या अनुषंगाने दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना नांदुरा यांच्या वतीने तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून चतुर्थ श्रेणी वेतन, तांत्रिक अडचणी असतील तर २५ हजार रुपये वेतन,सेवा निवृत्तीनंतर दहा लाख रुपये निर्वाह भत्ता, कोतवाल कर्मचारी यांना दहा हजार रुपये पेन्शन,तत्सम पदासाठी २५ टक्के आरक्षण, इत्यादी मागण्या पूर्ण कराव्या.त्रिपुरा ,गुजरात राज्याने मंजूर केलेली (चतुर्थ श्रेणी वेतन)मागणी महाराष्ट्रात मंजूर करण्यात येऊन चतुर्थ श्रेणी दर्जा कोतवाल कर्मचारी यांना देण्यात यावा.
आंदोलन, उपोषण, आत्मदहन, कामबंद आंदोलन इत्यादी प्रकरने करूनही शासनाने दखल घेतलेली नाही. कोतवाल संघटने वतीने निवेदन देते प्रसंगी उपस्थित विष्णू एकनाथ सानप (अध्यक्ष, कोतवाल कर्मचारी संघटना नांदुरा तालुका) आदिक शहा, इस्माईल शहा (सचिव)गणेश गोवर्धन बकाल (जिल्हा सचिव) सौ. वंदना संजय चंदन गोळे, ज्ञानेश्वर पुंजाजी झांबरे, प्रभाकर श्रीराम भिसे, श्रीधर नाव्हकर, रामेश्वर बावणे आदी. सदस्य उपस्थित होते.