सरकारी मालमत्तेवर ताबा, मुख्याधिकऱ्यांनी नऊ दुकानाला लावले सील
श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा शहरांमध्ये मागील विस वर्षापासून अवैध ताबा केलेल्या नऊ दुकानाला नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. आशिष बोबडे यांनी सील ठोकले. याबाबत सविस्तर वृत्त असे की शहराच्या मध्यवर्ती जागेवर असलेल्या कोंडवाडा जागेवर नगरपरिषदेने बांधकाम करून तेरा दुकाने बांधली आहेत . जाहिर लिलावानंतर चार दुकाने विकल्या गेली होती. त्यानंतर प्रकरण न्याय प्रविष्ट झाल्यावर दुकानांची विक्री थांबली आहे. परंतु याच संधीचा फायदा घेऊन विस वर्षापासून नऊ दुकानावर काही लोकांनी अवैध ताबा केला होता. समाजसेवक शेख राजीक शेख रहिम यांना या दुकानांवर काही लोकांनी अवैध ताबा केलेला असुन कुठलेही भाडे मीळत नसल्याचे माहितीच्या अधिकारातुन समजले .
त्यावर शेख राजीक शेख रहिम यांनी नगरपरिषदेने ही दुकाने ताब्यात घ्यावी अन्यथा आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनला दिला होता.त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दि.२९ जुलैला त्या अवैध दुकानांवर पोलिस व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करून सील ठोकले . त्यामुळेे शहरात नगरपरिषदेच्या इतर ठीकाणी असलेल्या दुकानावर अवैध ताबा केलेल्या मध्ये मात्र धाकधूक सुरू झाली आहे.