आझादी गौरव पदयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे आ. राजेश एकडे
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
देशाला गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करण्यात काँग्रेसचे खुप मोठे योगदान आहे. या योगदानाला स्मरण करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आझादी गौरव पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्याधर्तीवर या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव, निभर्यता, एकजुटता व एकसंघटतेचा संदेश संपूर्ण देशवासियांना दयावयाचा आहे. त्याकरीता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही आझादी गौरव पदयात्रा यशस्वी करायची आहे. त्यादृष्टीने सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी माहिती आ. राजेश एकडे यांनी बोलविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. आ. राजेश एकडे यांनी बोलतांना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य होवून ७५ वर्षे पूर्ण झाली. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात काँग्रेसच्या इतिहासाशिवाय कदापि पुर्ण होवू शकत नाही.
काँग्रेसच्या स्थापनेपासून महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, मौलाना अबुल कलाम आझाद, दादाभाई नौरोजी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल अशा अनेक नेत्यांनी वर्चस्व पणाला लावून संपूर्ण भारतीयांमध्ये एकजुट निर्माण केली व अहिंसेच्या मार्गाने जात या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. याच स्वातंत्र्याचा संघर्ष भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा अनेक क्रांतीकारांचे बलिदान देशवासी विसरणार नाही. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे व अमृत महोत्सवी वर्ष २०२२ च्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात आझादी गौरव पदयात्रा काढून काँग्रेसच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. दरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणाविरूध्द बोलेल त्याच्या विरुध्द खोटी प्रकरणे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे महापाप, जातीधर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करून समाजातील घटकांना दहशतीखाली जगावे लागणारे जीवन, त्याचप्रमाणे तिरंग्याचा तिरस्कार करणाऱ्यांचे तिरंगा प्रेम हे मागील ८ वर्षात केलेली ८ पापे तिरंग्याखली झाकण्यासाठी आहे. अशा परिस्थितीत तमाम गोरगरीब सर्व जातीधर्माच्या लोकांना शेतकरी, शेतमजूर यांना संघटीत करून देशव्यापी चळवळ काँग्रेस उभी करत आहे. म्हणून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मलकापूर विधानसभा मतदार संघात आझादी गौरव पदयात्रा ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणगाव पासून सुरू होवून सायंकाळी ७ वाजता मलकापूरात येईल. पुनःश्च १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये मलकापूर येथील कृउबासच्या मैदानातून सुरुवात होईल व या पदयात्रेचा समारोप दाताळा येथे जाहीर सभेनंतर होईल. ११ ऑगस्ट रोजी दाताळा येथून उमाळी, वरखेड, मेंढळी मार्गे नांदुरा तालुक्यात या पदयात्रेचा प्रवेश होणार आहे. या देशाच्या हुकूमशाहीत व दमननीतीचा विरोध दर्शविण्यासाठी या पदयात्रेत सर्व जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतांना आ. एकडे यांनी सांगितले. यावेळी भाराकाँ नेते अॅड. साहेबराव मोरे, डॉ. अरविंद कोलते, हाजी रशिदखाँ जमादार, तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, राजेंद्र वाडेकर, शहराध्यक्ष राजू पाटील, शिरीष डोरले, सोपान शेलकर, निवृत्ती तांबे, अॅड. जावेद कुरेशी, जाकीर मेमन यांचेसह आदी उपस्थित होते.