यवत पालखी तळ हत्या प्रकरणातील आरोपी यवत पोलिसांनी केला अटक
विजय कदम प्रतिनिधी दौंड
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चार टीम तयार केल्या होत्या यवत गुन्हे शाखेतील निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली व सदर आरोपी हा नेपाळ देशातील रहिवासी असून आरोपी दौंड रेल्वे स्टेशन येथून नेपाळला जाणार आहे अशी गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली असता यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक API केशव वाबळे यांच्या पथकाने दोन दिवस दौंड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला असता दिनांक 6/ 8/ 2022 रोजी मध्यरात्री दौंड रेल्वे स्टेशन येथून गुन्ह्यातील आरोपी राजबहादुर बालू सिंग ठाकूर उर्फ राजू सारथी वय ४७ वर्ष. सध्या राहणार यवत तालुका दौंड जिल्हा-पुणे. मुळगाव पहाडेपूर नेपाळ यास अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार मी पालखीतळावर बसलो असता मयत इसमाने दारू पिऊन मला शिवीगाळ केली व माझे कानाखाली चापट मारली म्हणून मी चिडून जाऊन मयताच्या पोटात चाकू मारून खून केल्याचे सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस पथकाने केलेली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार ,API केशव वाबळे, पोलिस कर्मचारी निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड , अक्षय यादव, मारुती बाराते तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार सचिन घाडगे,अजित भुजबळ,अजय घुले यांच्या पथकाने केली आहे