गांधीनगर मधे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ !
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
अन्नाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या अथक प्रयत्नातून आज सकाळी ८.३० वाजता गांधी नगर येथील रस्ता काँक्रीटीकरणाचे कामाचा माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. सदर प्रसंगी त्यांच्या समवेत मलकापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक राजदेव हरीभाऊ पाटील सर, केदार एकडे मिली हवले, कुणाल येवतकर, क्रिष्णा तायडे, चंद्रपालसिंग राजपूत, दिपक कपले राहूल देशमुख, सुनिल हवले, राजेश जामोदे, पंकज आमोदे, रविंद्र राणे, अर्जून कंडारकर उत्तम कदम, शैलेश येवतकर, जनार्दन भोबे, पिंटू पाचपांडे, विजय पवार, भूषण सपकाळ, गोविंदा कदम, रविंद्र आले, जानीमल जरानी विशाल मदवानी, राजू सावळे. अनिल आहुजा, दिलीप इंगळे, इमरान शेख राजू टाक, मानसिंग सारसर गणेश टाक, संतोष चंडाले आदी मान्यवर व परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.